Welcome

Welcome to the website of Open Educational Resources for Schools (OER4S). It is an innovative project undertaken jointly by Homi Bhabha Centre for Science Education (HBCSE), TIFR, Mumbai, Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) and Indian Consortium for Educational Transformation (I-CONSENT). The project is financially supported by the Rajiv Gandhi Science and Technology Commission (RGSTC), Government of Maharashtra.

OER4S aims at bringing out educational resources to improve school education and to make it enjoyable. This website provides educational material relevant for students, teachers and parents. It is hoped that the use of these resources would enable to improve the quality of teaching learning process in the schools of Maharashtra.

Open Educational Resources are accessible freely by all the stakeholders (students, teachers and parents) for their use. They should to choose the resources that they find useful to them. Feedback from all the three stakeholders is earnestly solicitated to improve the material.

स्वागत आहे

शालेय शिक्षणासाठी उपयुक्त अशा मुक्त शिक्षण स्रोत प्रकल्पाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. हा अभिनव उपक्रम होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टि. आय. एफ. आर, मुंबई, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आणि इंडियन कन्सॉर्शियम फॉर एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे आर्थिक पाठबळ लाभले आहे.

शालेय शिक्षण दर्जेदार व आनंददायी करण्यासाठी मुक्त शिक्षण स्रोतांची निर्मिती करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या संकेतस्थळावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना उपयुक्त ठरतील असे शैक्षणिक स्रोत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या स्रोतांचा उपयोग करून महाराष्ट्रातील शाळांमधील अध्ययन अध्यापनाचा स्तर उंचावावा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत व्हावी अशी अपेक्षा आहे.

सदर संकेत स्थळावरील सर्व साहित्य विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहे. उपलब्ध शैक्षणिक स्रोतांमधून आपल्याला उपयुक्त ठरतील असे शिक्षणस्रोत प्रथम निवडावेत. त्यातील माहितीचा वापर करावा आणि आपले या संदर्भातील अनुभव आम्हाला कळवावे. जेणेकरून या साहित्यात योग्य ते बदल करता येतील.