समभागांसंबंधी माहिती आणि कंपनीची ओळख
माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षमता जलद गतीने विकसित करणारी संस्था म्हणून कंपनीच्या संस्थापकांनी एमकेसीएलची आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली
महाराष्ट्र शासन, राज्यातील दहा विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असणारे व नसणारे उद्योगधंदे यांचा सुरुवातीच्या प्रमुख समभागधारकांमध्ये समावेश आहे. महाराष्ट्र शासनाचा ३७.१३% एवढा हिस्सा असून कंपनीने एका बाजूला शासनाची विश्वासार्हता आणि सामाजिक जबाबदारी यांचा, तर दुसर्या बाजूला व्यावसायिक स्पर्धात्मकता, बाजारपेठेचे भान, गुणवत्ता, परिवर्तनशीलता, उत्पादकता, लाभदायकता आणि स्वयंपूर्णता यांचा आगळावेगळा समन्वय साधला आहे.
एमकेसीएलच्या समभागांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे:
प्रकार | एकूण घातलेल्या भांडवलाची टक्केवारी | समभागांची संख्या | |
---|---|---|---|
१ | महाराष्ट्र शासन | ३७.१३% | ३०००००० |
२ | विद्यापीठे | ३३.९१% | २७४०००० |
५ | अन्य (यामध्ये व्यक्तीही समाविष्ट आहेत) | २८.४६% | २३०००२० |
४ | संचालक | ०.२३% | १८५०० |
३ | शैक्षणिक संस्था | ०.२६% | २०९२५ |
3 | गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय | ०.०१% | ७५० |
एकूण | १००% | ८०८०१९५ |

विशेष ओळख
जलद गतीने माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षमता विकसित करणारी आणि विद्यापीठे, शासन व समाज यांच्यासाठी पूरक तसेच सहाय्यक भागीदार संस्था, अशी एमकेसीएलची एक आगळीवेगळी ओळख संस्थापकांनी प्रस्थापित केली. एकविसाव्या शतकातील ज्ञानकेंद्रित समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था यातील जनसामान्यांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या, नवनवीन वाढत्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करणे हा एमकेसीएलचा मुख्य उद्देश होता.