मागील कार्यक्रम
Abhaya
- 07-03-2019
- 5:45 PM to 8:00 PM
Tilak Smarak Mandir,
Sadashiv peth, Tilak Road,
Pune - 411 030.A one-act play “Abhaya” (एकपात्री नाटक: ‘अभया’): An eye-opening story of a school going girl, who is fallen victim to sexual offenders. How she fights the system to seek justice?. This play is directed by noted television personality Mrs. Meena Naik.
Anatar Manatle Hunkar Kathak Dance
- 07-03-2019
- 5:45 PM to 8:00 PM
Tilak Smarak Mandir,
Sadashiv peth, Tilak Road,
Pune - 411 030."Anatar Manatle Hunkar" is a Kathak Dance (कथक नृत्याविष्कार: ‘अंतर्मनातले हुंकार’). Since olden days women had to go through various challenges and sufferings in their roles as Mother, Sister, Daughter and Wife . This dance performance is an attempt to showcase their feelings hidden in their mind. Noted Kathak Guru Shamatai Bhate has created and director this dance performance. All eminent kathak performers of Naad-Roop are going to present this performance.
Copenhagen Play
- 20-03-2018
- 4.30 PM to 7:00 PM
राम गणेश गडकरी रंगायतन,
डॉ मूस मार्ग, घंटाळी,तालावपाळीजवळ,
ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०२मायकेल फ्रायन ह्यांचे कोपनहेगन हे नाटक ब्रिटिश रंगभूमीवर १९९८ साली आले. त्याचे ३०० हुन अधिक प्रयोग लंडनच्या नॅशनल थिएटरमधे झाले. २००० साली ब्रॉडवेवर ३२६ प्रयोग , २००२ साली BBC ने त्यावर टेलिफिल्म केली. आपल्याला कदाचित युद्ध मानसिकदृष्ट्या खूप लांबची गोष्ट वाटते. दोन महायुद्धे रशिया, फ्रान्स वगैरे युरोपिअन देश आणि ब्रिटन, जपान यांनी अनुभवली. एखाद्या दुःस्वप्नासारखी त्या देशातील जनतेच्या मनात ती कोरली गेली आहेत
प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि विसाव्या शतकातील पदार्थविज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचा जनक डेन्मार्कचा नील्स बोर आणि त्याचा आवडता पट्टशिष्य जर्मनीचा वर्नर हायझेनबर्ग यांची दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना १९४१ साली भेट झाल्याचे इतिहासाला ठाऊक आहे, पण या भेटीत नेमके काय घडले, काय चर्चा झाली, त्याचा जर्मन अणुबाँब निर्माण करण्याच्या प्रयत्नावर काय परिणाम झाला – याबद्दल एकवाक्यता नाही. इतिहासाला एकाद्या धुक्याप्रमाणे गूढ धूसर असणाऱ्या या भेटीवर मायकेल फ्रायनचे ‘कोपनहेगन’ हे नाटक आधारले आहे.
आपण थिअरेटिकल फिजिक्सचे विद्यार्थी नसलो तर आपल्याला बोर – हायझेनबर्ग – श्रॉडिंजर हे नोबेल विजेते शास्त्रज्ञ किवा न्युक्लीअर फिजिक्स अथवा क्वांटम मेकॅनिक्स ठाऊक असायचे कारण नाही. नाटकात हे शास्त्रज्ञ पात्रे म्हणून येतात, तेव्हा त्यांची काही संभाषणे या भाषेत होणे अपरिहार्य देखील आहे. या संभाषणांचा संबंध मानवजातीच्या भवितव्याशी व एका नव्या क्वांटम नितीशास्त्राशी पोहोचतो, हे समजल्यावर कान टवकारणे मात्र आवश्यक आहे.
Launch Event of website on Acharya Vinoba Bhave
- 23-11-2017
- 6.00 PM to 8:30 PM
Tilak Smarkar Mandir Sabhagruha,
Tilak Rasta S.P College
Pune, Maharashtra 411030आचार्य विनोबा भावे यांचे अक्षर विचारधन समाजाच्या विभिन्न स्तरांत – विशेषतः युवा पिढीपर्यंत -पोचवण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. माहितीच्या स्फोटाच्या आजच्या काळात ज्ञानाचा प्रसारही वेगाने होणे गरजेचे आहे. ‘ज्ञानदीप लावू जगी’ हे बोधवाक्य असलेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने या दृष्टीने विनोबांच्या जीवनकार्यासंबंधित समग्र साहित्य वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संबंधातील अनेक पुस्तके, दुर्मिळ दस्तावेज, नियतकालिके अशी, आजवर कुठेही एकत्रितपणे उपलब्ध नसलेली सुमारे एक लाख पृष्ठांची सामग्री या वेबसाइटवर आजच उपलब्ध केली जात आहे.
विनोबांचे साहित्य आणि कार्य यांबाबत उत्सुकता आणि रुची असणाऱ्या जगभरातील लोकांसाठी हे विशाल भांडार आता खुले होत आहे. www.vinoba.in असे या वेबसाइटचे नाव असून विनोबा साहित्याचे स्वत्वाधिकार असलेले परंधाम प्रकाशन, पवनार या वेबसाइटचे संचालन करणार आहे.
EduTech Conference
- 10th and 11 November, 2017
- 9.30 AM to 6:30 PM
Sir C. V. Raman Auditorium,
Indian Institute of Science Education and Research (IISER)
Dr. Homi Bhabha Road, NCL Colony, Pashan,
Pune, Maharashtra 411008About the Conference: The conference has been planned for brainstorming on emerging trends and grand challenges in the field of education. A highlight of the conference will be the release of the document "Technology Roadmap of Education" prepared by TIFAC.